प्रतिनिधी, जळगाव : महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील गरिबांची दिवाळी आनंदात व्हावी यासाठी शंभर रुपयांमध्ये आनंदितचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयामुळे आज वरणगाव मध्ये गरजू आणि गरीब नागरिकांना शंभर रुपयांमध्ये आनंद किटचे वाटप करण्यात येत आहे, यामुळे गरजू व गरीब नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
भुसावळ तालुक्यामध्ये आनंद किटचे वाटप ऐन दिवाळीच्या तोंडावर ती म्हणजे आज पासून सुरू करण्यात आले आहे, आनंद किट घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानावरती नागरिकांची एकच गर्दी पाहावयास मिळत आहे, ज्या नागरिकांनी आनंद किट घेतली आहे, त्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले आहे, गरीबाची दिवाळी शंभर रुपयांमध्ये आनंदात होणार असल्याचे या नागरिकांनी सांगितले आहे, या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो डाळ व एक किलो तेल देण्यात येत आहे
