जनतेज न्युज

खड्ड्यात दिवे लावून केली दिवाळी साजरी…नगरपालिका विरोधात महिलांचा संताप

प्रतिनिधी, नाशिक : येवला शहरातील महाराणा प्रताप पुतळ्या समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये दिवे लावत येथील स्थानिक नागरिकांनी आपली दिवाळी साजरी करत नगरपालिका प्रशासना विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आहे. गेल्या तीन वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली असून वेळोवेळी रस्ता तयार करून देण्याची मागणी केली असून प्रशासन सर्रास सर्रास दुर्लक्ष करत असल्याने येथील रहिवाशांनी गांधीगिरी पद्धतीने खड्ड्यांमध्ये दिवे लावत आपली दीपावली साजरी केलीय. आता तरी रस्ता करून द्यावा अशी मागणी महाराणा प्रताप पुतळ्या समोरील रहिवाशी करीत आहे.