जनतेज न्युज

जिल्हा कारागृहात एकादशी निमित्त विठू नामाचा गजर

प्रतिनिधी ,  बीड : आषाढी एकादशीनिमित्त बीडच्या जिल्हा कारागृहात देखील विठुनामाचा गजर ऐकायला मिळाला. जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे यांच्या पुढाकाराने कारागृह परिसर भजन कीर्तनाने मंत्रमुग्ध झाला. सबंध राज्यभरात एकादशीनिमित्त विठुनामाचा गजर ऐकायला मिळतोय. आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहात देखील विठूनामाचा गजर करत कैद्यांनी अभंग गवळणी सह विठुरायाकडे साकडे घातले. तर मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली आहे.