प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात गादीचे व्यापारी मोहम्मद मन्सूरी यांही नेहमी प्रमाणे अपली दुचाकी दुकानासमोरील रस्त्यावर उभी करून ठेवली होती. दुपारच्या सुमारास आलेल्या एका अज्ञात चोरट्याने चाविसारख्या तत्सम वस्तूने दुचाकीचे लॉक खोलत काही क्षणात ही दुचाकी घेऊन निघून गेला. चोराचा आत्मविश्वास पाहून आजूबाजूच्या नागरिकांना ही दुचाकी त्याचीच असावी, असे वाटले त्यामुळे त्याला कोणीही रोखले नाही. थोड्या वेळाने दुचाकी मालक आपली दुचाकी घेण्यासाठी आला असता त्याला आपली दुचाकी न सापडल्याने त्याने शोधाशोध केली. मात्र, त्याला दुचाकी न सापडल्याने त्यांनी दुचाकी उभी असलेल्या समोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही पाहिले असता एक चोर त्याची गाडी घेऊन जाताना दिसला. त्यानंतर मोहम्मद ने लगेचच पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी महात्मा फुले स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरा च्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहे.
