जनतेज न्युज

कल्याण मध्ये दिव्यांग महिलांचे हळदी कुंकू

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण मध्ये भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने दिव्यांग महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिव्यांग महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावत कार्यक्रमाचा आनंद लुटला.