जनतेज न्युज

कल्याण पूर्व भागातील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरील घराला भीषण आग

प्रतिनिधी, कल्याण  : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील कोहिनूर आशियाना इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका घरात लागलेल्या आगीत घरातील किमती साहित्य जळून खाक झाल्याची घटना रात्री घडली. रहिवाशांनी सतर्क होऊन आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. चिंचपाडा परिसरातील कोहिनूर आशियाना इमारत नवी असून सात ते आठ महिन्या पूर्वीच रहिवाशांना विकसकाने घरांचा ताबा दिला आहे. मात्र, या कालावधीत इमारतीत दोन वेळा आगीची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी घरातील नवे कोरे किमती सामान जळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.