जनतेज न्युज

धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर

प्रतिनिधी, बीड : बीडमध्ये अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. याच आशयाचे बॅनर सध्या बीडमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅनरवर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेही फोटो आहेत. आणि यातून कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या..! अशी भावनिक साद पवारांना घालण्यात आली आहे. आज शरद पवार यांची बीडमध्ये सभा होते आहे. आणि सभेपूर्वीच हे बॅनर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. मात्र, आज अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या भव्य स्वागताचे देखील नियोजन करण्यात आले आहे.