जनतेज न्युज

केबीसीच्या नावाने बीडमध्ये एका व्यक्तीची 30 लाखाची फसवणूक

प्रतिनिधी, बीड : कौन बनेगा करोडपतीच्या नावाने बीडमध्ये एका व्यक्तीची 30 लाखाची फसवणूक करण्यात आली. याचे जाळे थेट पाकिस्तानशी असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड सायबर सेलने बिहारमधून दोघा जणांना अटक केली आहे. बीडमधील एका व्यक्तीला 98 लाख रुपये किमितीची कार लॉटरीत लागल्याचे सांगून त्याच्याकडून तब्बल 29 लाख २३ हजार रुपये उकळण्यात आले होते. सदर व्यक्तीने तक्रार केल्यानंतर याचा तपास बीडच्या सायबर सेलने केला आहे. गुजरातच्या व्यापाऱ्याकडून हे पैसे थेट पाकिस्तानात पोहच करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हा पैसा देश विघातक कामासाठी वापरण्यात येतो का याचा तपास बीड पोलीस करीत आहेत. भारतातून आतापर्यन्त 18 कोटी रुपये पाकिस्तानमधल्या व्यक्तीच्या खात्यावर गेले असल्याची माहिती समोर येते.