प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात वेगाने इनोव्हा गाडीची रेस लावलेल्या वाहनचालकाने स्वर्गवासी विक्रांत संतोष मिश्रा या बालकाचा भरधाव वाहनाच्या धडाक्यात अपघात घडल्याचे दुर्देवी घटना घडली आहे. संबंधित वाहन चालक व त्याच्या पालकांवर कठोर कारवाई व्हावी व तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी डायमंड व्हाट्सएप ग्रुपच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. जळगाव शहरात अल्पवयीन वाहन चालकांना पालक ज्या पद्धतीने वाहने चालवण्यासाठी देतात ते कायद्याने चुकीचे आहे. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे असल्याची मागणी डायमंड ग्रुप च्या वतीने करण्यात आली आहे.
