प्रतिनिधी, संभाजीनगर : यापूर्वी शहरांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत संभ्रम होता. आज महानगरपालिकेच्या वतीने शंभर प्रक्रिया केंद्र सुरू आहे. फक्त त्या ठिकाणी कचरा हा वर्गीकरण करून येत नव्हता. आम्ही मनपा कर्मचारी व लोकप्रतिनिधींकडून सहकार्य करून सर्व जनतेने डोक्यावर घेतले आहे. म्हणून शहरांमध्ये वीस पंचवीस टक्यावरून 95% पर्यंत कचरा वर्गीकरण पोहोचलेलं आहे. रस्त्यावर कचरा फेकण्यापेक्षा स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्यासाठी आपण आपल्या जवळच्या कचरा घंटागाडीमध्येच कचरा टाकावा. तुमच्या जवळची घंटागाडी कुठे आहे. त्या मोबाईल ॲपवर आपल्याला कळून चुकेल कचरा रस्त्यावर न फेकता घंटागाडीतच द्यावा प्रयत्न करून आपलं शहर स्वच्छ व सुंदर कसे दिसेल याकडे लक्ष द्यावे. ज्या ज्या ठिकाणी कचरा फेकणारे आहेत त्याठिकाणी इंडियन आर्मीमध्ये काम केलेले एक्स सर्विस मॅन आहेत. ते यापूर्वी बॉर्डर गार्ड करत होते आता ज्याठिकाणी कचरा फेकणारा पॉईंट्स आहे, त्या ठिकाणी उभे राहून कचरा फेकणाऱ्यांना दंड करतील. आम्ही जेवढं बॉर्डर सुखरूप ठेवतो तसं शहर सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी माजी सैनिक आहेत. त्याठिकाणी रात्रंदिवस काम करत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात दंड आकारून काही कालावधीमध्ये ज्या ज्या घरामध्ये कचरा आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. काही भागांमध्ये रूट मार्च सुरू आहे. मोठ्या लोकांना ते कळत नाही विद्यार्थ्यांना कळतं छोट्या मुलांनी मोठ्यांना शिकवा, असे आम्ही काम करत आहोत. सध्या शहरात डोळ्याची साथ सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी ड्रॉप कमी पडत आहेत. कारण की उद्या होणाऱ्या महाआरोग्य शिबिरासाठी आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचून शासकीय योजनांमध्ये पात्र होणाऱ्या लाभार्थी व न होणाऱ्या लाभार्थ्यांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळावा, असे आवाहन आम्ही करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी औषध तूटवडा आला त्या त्या ठिकाणी आम्ही औषध पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही जनतेला या माध्यमातून आव्हान करतो महाआरोग्य शिबिराला आपण आलात आणि आपण योजनेत बसत असाल आणि नसाल तरीही आम्ही प्रयत्न करू आणि याठिकाणी मोफत उपचार होतील. तरी आपण सर्वांनी या महाआरोग्य शिबिरास यावे असे आवाहनही मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले आहे.
