प्रतिनिधी, बुलडाणा : पोळ्याच्या दिवशी खामगावात शुल्लक कारणावरून ऐन गर्दी च्या वेळेस दोन गटात तुफान दगडफेक झाली होती या प्रकरणात खामगाव पोलिसांनी ७६ जणावर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत या पोलिसा च्या भूमिकेविरोधात भाजपा आमदारानि नाराजी व्यक्त करित खामगाव शहर बंद करण्याचं आवाहन केल. त्यांच्या आवाहनाला आज सकाळपासुन् खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे… तसेच खामगाव शहरातील तीन पोलीस अधिकार्यांना गणेशउत्सवावेळी बाहेर जिल्ह्यात पाठवावे अशी मागणी आ फुंडकर यांनी केली आहे. पोळ्याच्या दिवशी जी दगडफेक झाली त्याला जबाबदार हे पोलीस अधिकारीच असल्याचा गंभीर आरोप चक्क आमदारानि केला आहे.आज खामगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान आमदार, त्यांचे कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी शहरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत आहे.
