जनतेज न्युज

ऑनलाईन व्यवहारामुळे पाकीट मारीच्या घटनेत घट

प्रतिनिधी, धुळे : सर्वसामान्य नागरिकांचा दिवसेंदिवस कल ऑनलाइन व्यवहाराकडे वाढला आहे. यामुळे याचा फायदा सामान्य नागरिकांना होत असला तरी याचा फटका मात्र पाकीटमारांना सध्या बसल्याचे पाहायला मिळतंय. धुळे शहरात सन 2022 मध्ये ऑगस्ट पर्यंत पाकीट मारीची फक्त एकाच गुन्ह्याची नोंद झाल्याने डिजिटल व्यवहाराचा फटका चोरट्यांना बसत असल्याचे समोर आले आहे.सध्याच्या परिस्थितीत सामान्य नागरिक आपले सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने वापर करताना आपल्याला दिसून येत आहे. छोट्यातील छोटी गोष्टी साठी माणूस आता ऑनलाईन पेमेंट चा वापर करीत आहे. ऑनलाइन व्यवहारामुळे सर्वसामान्य नागरिक खिशात पाकीट ठेवत नसल्याने गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारांचा हात साफ होत नसल्याचे समोर आले आहे. तर पाकिटात जास्त पैसे नसल्यामुळे ते मारले गेले तरी काही जण गुन्हा नोंदविण्यासाठी येत नसल्याने देखील पाकीट मारीच्या संख्येत घट झाली आहे. याबाबत धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या सामान्य नागरिकांचा कल हा डिजिटल पेमेंट कळे अधिक वाढला असून, प्रत्येक व्यक्ती हा खिश्यात कमीत कमी पैसे ठेवणे पसंत करतो आहे. त्यामुळे चोरट्यांनी देखील आपला मोर्चा आता इतर चोरी कडे वळवला आहे. त्यामुळे पाकीट मारी पासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक डिजिटल पेमेंट चा उपयोग करावा व आपल्या कडे असलेल्या रक्कमेची काळजी घ्यावी असे आवाहन धुळे शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले.
धुळे शहरात 2019 पासून झालेल्या पाकीटमारीच्या घटना

2019 मध्ये 9
2020 मध्ये 11
2021 मध्ये 7
2022 मध्ये ऑगस्ट पर्यंत 01

धुळे शहरात वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असलेले या ठिकाणी पाकीट मारायला जास्त संधी मिळत नाही या उलट शहरासह जिल्ह्यात मात्र गेल्या काही दिवसांपासून चोरी घरफोडी, चेन स्नॅचिंगचे गुन्हे मात्र वाढले आहेत. यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.