प्रतिनिधी , अमरावती : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन आज सम्पूर्ण राज्यात झाले अमरावतीतर राज्यसभा खासदार व भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये आज गणरायाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव हा छोटे खानी देखावा सुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे, राज्यातील शेतकऱ्यांना सुखी समृद्ध राहू दे अशी प्रार्थना या वेळी खासदार बोंडे यांनी यावेळी केली यावेळी अनिल बोडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे मुलगी मनाली बोडे उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर उत्साह या ठिकाणी दिसून आला.
