जनतेज न्युज

लवकरच महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील – अजित नवले

प्रतिनिधी, सांगली : लोकशाहीची एक प्रकारे चेष्टा करून आणि लोकशाहीचा खून पाडून हे आताच सरकार अस्तित्वात आले आहे. ईडीचा गैरवापर केला गेला. महाविकास आघाडीचे सरकारची तोडफोड करून शिंदे – भाजपच सरकार अत्यंत अनैसर्गिकपणाने सत्तेवर आलेले आहे. हे सरकार टिकणार नाही आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील अस मत किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस अजित नवले यांनी व्यकत केले. सांगली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात नवले हे बोलत होते. आज ज्या प्रकारे हे महाविकास आघाडीचे सरकार आणि खरिपाच्या वेळी पाडण्यात आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप आणि शेतकरी धोक्यात आला आहे. हे पाप देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले. नुकसान भरपाईच्याबद्दल आणि पंचनामे करण्याबद्दल ज्या प्रकारची दिरंगाई सुरू आहे. त्यामुळे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय, अशा प्रकारची व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात आली आहे. कोणी मागणी केली नसताना नोकऱ्यांमध्ये दहीहंडी खेळणाऱ्या पोरांना 5% आरक्षण द्यायचं. मराठा शेतकरी जे मोठ्या प्रमाणात शेती संकटात आल्यामुळे आज आरक्षणाची मागणी करतात मोठ्या प्रमाणामध्ये इतर समुदाय आरक्षणाबद्दल आपल्या मागण्या करत आहेत.