प्रतिनिधी , नाशिक : शहर परिसरातून लॅपटॉप चोरी करणा-या आरोपीस मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याकडून चोरी केलेले दीड लाख रुपये किमतीचे लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात चोरट्यानी लॅपटॉप चोरीकडे आपला मोर्चा वळवला होता.त्यामुळे शहर परिसरात लॅपटॉप चोरीच्या गुन्हयांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले.यातच मुंबई नाका पोलीस ठाण्यात सुधाकर विनायक पाटिल यांचे अशोका बिजनेस स्टील, अशोका मार्ग इथल्या कार्यालयातुन लॅपटॉप चोरीस गेला होता याबाबतच्या गुन्हयाचा तपास चालु असतांना, मुंबई नाका पोलीस गुन्हेशोध पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडून चोरीस गेलेले तीन डेल कंपनीचे लॅपटॉप हे वडाळा गाव येथे राहणारा संशयित आरोपी गणेश दशरथ जेडगुले याने चोरून नेल्याची व तो परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार रोमोशी वाडी, वडाळा गाव परिसरात जवळ गुन्हे शोध पथकाकडून सापळा रचुन या संशयिताला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता संशयित गणेश जेडगुले याकडून प्रत्येकी ५०,००० रूपये किमतीचे असे एकुण तीन डेल कंपनीचे लॅपटॉप आय थ्री मॉडेलचा मुद्देमाल अस एकुण १,५०,००० रूपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत.तर संशयित गणेश जेडगुले कडुन आणखी लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना असून त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे.
