प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कारागृहामध्ये कुबेर रुग्ण आढळल्यानंतर मनपा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले आपल्याकडे शहरांमध्ये एक दीड महिन्यात रुग्णांची संख्या वाढली तर लॅब फॅसिलिटी आहे. जीएमसी, बामु आणि प्रायव्हेट च्या आहे त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांची पोझिशन कशी आहे तेही पाहणार आहे. विद्यापीठातील लॅबला आज मी स्वतः जाऊन तिथं पाहणी करून आलो आहे. आणि त्यांना काही विषय असतील तर त्यावर चर्चा सुद्धा केली त्यांना सांगण्यात आलेले आहे. की काही विषय असेल तर त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून सुसज्ज ठेवा असे आदेश दिल्याचे पारस मंडलेचा यांनी म्हटले आहे.
