जनतेज न्युज

मोहरद येथे बस नसल्याने विद्यार्थ्यांच्या होत आहे हाल मोहरद बस सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी, जळगाव : मोहरद बिडगाव येथून धानोरा अडावद आणि चोपडा येथे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत असतात परंतु या मोहरद  गावाला बस येत नसल्याने धानोऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांना पायी यावे लागतं आणि त्या ठिकाणाहून अडावद चोपडा येते विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात शिक्षणासाठी ये जा करावी लागत असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींना बस नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी बिडगाव मोहरद  या ठिकाणी बस सेवा सुरू होती परंतु त्यानंतर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांसह वृद्ध नागरिकांना देखील धानोऱ्या पर्यंत पायी यावे लागत आहे. यासाठी आज मोहरद गावाचे सरपंच आणि विद्यार्थी  यांनी आगार व्यवस्थापकाकडे बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.