जनतेज न्युज

कोल्हापूरात भुदरगड येथे पत्रकार दिन साजरा

प्रतिनिधी, कोहलपुर : पत्रकारिता शस्त्र नाही तर अस्त्र आहे. यासाठी पत्रकारांनी भान राखून काम करावे असे आवाहन डॉ. राजेद्र रत्नाबाई बळवंत यांनी केले. ते शाहू नाचनालय गारगोटी ( ता भुदरगड ) येथे आयेजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्य प्रमुख वक्त्ये म्हणून बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात यावेळी पुढे बोलताना डॉ राजेंद्र रत्नाबाई बळवंत म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळातील पत्रकारिता ही देशनिष्टेने भारलेली होती. स्वातंत्र्यानंतर त्याचे निकष बदलले असले तरी पत्रकारांच्या जबाबदारी वाढली आहे. देशात चाललेला वाढता स्वैराचार रोखण्यासाठी पत्रकारांनी जाणीवेने लेखन केले पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्थंब जागृत राहीला पाहिजे तरच स्वातंत्र्य चांगल्या पध्दतीने उपभोगू शकतो. यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, भुदरगड तालुक्यातील पत्रकारांनी  सामाजिक भान ठेवून आजवर वाटचाल केली आहे. सर्व पत्रकारांचे काम अभिनंदनास पात्र आहे. येणाऱ्या काळात पत्रकारांनी मिडियातील सारी आवाहने  पेलून सशक्त समाज उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत. युवा नेते राहूल देसाई म्हणाले की, पत्रकार ही समाजाचा महत्वाचा घटक असून त्याच्या लेखनीवर आजचा समाज उभा आहे. पत्रकार जितका सक्षम तेवढे समाजातील घटक प्रघल्भ होतात. पत्रकारांच्या लेखनीमूळे आंम्हास प्रेरणा मिळील्याचे शेवटी युवा नेते राहूल देसाई यांनी सांगितले. कार्यक्रमात अनेक पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून भुदरगड तालुक्यातील ४४ नुतन लोकनियुक्त सरपंचाचा सत्कार आमदार प्रकाश आबिटकर व युवा नेते राहूल देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. सुत्रसंचालन दैनिक पुढारीचे पत्रकार मारूती घाडगे यांनी केले तर आभार गजानन देसाई यांनी मानले.