प्रतिनिधी, पंढपुर : गेल्या आठवड्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गरम्य वातावरण पहायला मिळत आहे.. शहरा जवळील बुलढाणा – मलकापूर महामार्गां वर असलेल्या राजूर घाटातील डोंगरांमध्ये सकाळी पांढऱ्याशुभ्र ढगांनी डोंगर सजलेलं दृश्य पहायला दिसून आला आहे. हे दृश्य बुलढाण्यातील पर्यावरण प्रेमी प्रदीप डांगे यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे.
