जनतेज न्युज

जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात, सकाळच्या सत्रात संथपणे सुरू झाले मतदान, सोमवारी होणार आहे मतमोजणी

प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी या टप्प्यात मतदान होत आहे. यातील सहा ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. रविवारी 88 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झालाय. यातील मुल 3 ,चिमूर 4 ,भद्रावती 2 ,ब्रह्मपुरी 1, कोरपना 25 ,जिवती 29, तर राजुरा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याआधीच भद्रावती तालुक्यातील 1 राजुरा येथील 2, जीवती तालुक्यातील एक तर चिमूर व मूल तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत अविरोध निवडली गेली आहे. आज सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. सोमवारी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी विविध तालुकास्थानी घेतली जाणार आहे.