प्रतिनिधी , नांदेड : काही दिवसांपूर्वी शेकपाचे नेते तथा आमदार खासदार राहिलेले भाई केशव धोंडगे यांचे दुःखद निधन झाले होते. आज अशोक चव्हाण यांनी कंधार येथे जाऊन त्यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले व धोंडगे परिवाराचे सात्वन केले यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की पक्षनिष्ठा काय असते ते भाई केशव धोंडगे यांच्याकडून शिकावी सत्ता असो किंवा नसो भाई केशव धोंडगे यांनी शेकप पक्षाचे काम वयाच्या 102 वर्षापर्यंत केले व मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो व त्यांच्या परिवाराला या दुःखातून देव सावरू ही सदिच्छा बाळगतो.
