प्रतिनिधी, धुळे : प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ या उद्देशाने देशाची जागतीक राजधानी मुंबई पासुन पाकृतीक राजधानी डेहराडून पर्यंत ६७- वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मश्री, पद्मविभुषण डॉ.अनिल प्रकाश जोशी यांनी पर्यावरण जागृती सायकल यात्रेला २ ऑक्टोबंर रोजी सुरवात झाली. आज ही सायकल यात्रा धुळ्यात दाखल झाली. डॉ.अनिल जोशी यांनी शहरातील झेड.बी.पाटील महाविद्यलयात महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण स्नेही यांच्याशी संवाद साधला.निसर्गाचा ढासळता समतोल राखण्याचा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी जनमाणसात जागृतीसाठी मुंबई ते डेहराडुन अशी सायकल यात्रा पर्यावरणतज्ज्ञ डॉ.अनिल जोशी यांनी काढली आहे.२ ऑक्टोबंर रोजी मुंबई येथुन या यात्रेला सुरवात झाली.१९ नोव्हेबंर रोजी डेहराडून येथे यात्रा पोहचणार आहे.या सायकल यात्रेमध्ये १५ युवक-युवती सहभागी झाले आहेत. यात्रा ४० दिवसांमध्ये ७ राज्ये व शेकडो गावांमधून ५० हजार लोकांशी संपर्क साधणार आहेत. त्याचबरोबर एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देत २००० किमी अंतर पार करणार आहेत. या सायकल यात्रेचा मुख्य उद्देश समुद्रा पासुन पर्वता पर्यंत लोकांना जोडणे हाच आहे.
आपल्या देशाला जशी जीडीपीची GDP गरज आहे, तशीच आता जीईपीची GEP देखील गरज आहे. विकास तेव्हाच होईल जेव्हा जीडीपी आणि जीईपीचा समतोल साधला जाईल. हा संदेश जनमाणसात पोहचविण्याचे काम या माध्यमातुन करण्यात येत आहे. आज डॉ. अनिल जोशी आणि त्यांची टिम धुळे शहरात दाखल झाली यावेळी त्यांचे धुळ्यातील नियोजन माजी सैनिक, खानदेश रक्षक ग्रुपचे जिल्हाध्यक्ष उल्हास पाटील यांनी केले. त्यांनी दिवसभरात महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी यांच्याशी देखील संवाद साधला.धुळे शहरातील झेड.बी.पाटील महाविद्यलयात त्यांच्या हस्ते वृक्षलागवड देखील करण्यात आले. उद्या सकाळी ते पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहेत. सायकल यात्रेत दररोज सरासरी ४० ते ५० किमी प्रवास करत आहेत. डॉ. अनिल जोशी यांच्या समवेत प्रमोदचंद्र जोशी, देवेश कोठारी, अनिल डंगवाल, चंदन बोरा आणि इतर तरुण देखील उत्साहात सहभागी झाले आहेत.साधी राहणी राहणाऱ्या डॉ. अनिल जोशी यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेशज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मश्री, पद्मविभुषण डॉ. अनिल जोशी पर्यावरण संवर्धनासाठी सायकल प्रवासावर भर देतात. साधी राहणी हीच त्यांची खरी ओळख आहे. डॉ. जोशी हे पर्यावरणवादी, हरित कार्यकर्ते आणि हिमालयन एन्व्हायर्नमेंटल स्टडीज अँड कॉन्झर्व्हेशन ऑर्गनायझेशन या डेहराडूनस्थित स्वयंसेवी संस्थेचे ते संस्थापक देखील आहेत. त्यांच्या कार्यामध्ये मुख्यतः शाश्वत तंत्रज्ञान विकसित करणे समाविष्ट आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत २००६ मध्ये पद्मश्री तर २०२० मध्ये पद्मविभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
