प्रतिनिधी, नागपुर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्वपूर्ण तसेच महत्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत,त्यापैकीचं एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिध्द फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणे देखील आहे. त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा म्हणजेचं म्युझिकल फाउंटन तयार करण्यात आला आहे. याशिवाय लाईट शो देखील नागपूरकरांना आता बघता येणार आहे. आज या प्रकल्पाचे प्रथम प्रात्यक्षिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे. तलावाचे पाणी फाउंटनच्या माध्यमातून मधुर संगीताच्या तालावर नाचणार आहे. फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटन हा जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन असल्याचा दावा केला जात आहे. या म्युझिकल फाउंटन बरोबर वाजणारे संगीत दिग्दज संगीतकार ए.आर रेहमान यांचे आहे. हा प्रकल्प साकार करण्यासाठी केंद्र सरकारच्या रोड फंडातून ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकवेळ ४ हजार प्रेषक एकत्र या शो चा आनंद घेऊ शकणार आहे. मराठीतुन भाषेत प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर, हिंदीतून गुलजार आणि इंग्रजीतून महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात समालोचन स्वरूपात नागपूरचा गौरवशाली इतिहास ऐकायला मिळणार आहे. याशिवाय संगीतकार ए. आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेली सिग्नेचर ट्यून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील लोकप्रिय चित्रपटांच्या गीतांच्या तालावर पाणी नाचवले जाणार आहे मी कॉलेजमध्ये शिकत असतात क्लास मध्ये बोर झालो की मित्रांसोबत फुटाळा तलाव येथे यायचो. मित्रांसोबत चहा पीत बसायचो. या ठिकाणी अनेक तास कसे निघून जायचे ते कळायचे सुद्धा नाही. या तलावाने अनेकांचे लग्न सुद्धा जुळवून आणले असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
