प्रतिनिधी, बुलडाणा : प्रत्येक सण उत्सव पिढी,परंपरेनुसार साजरा करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कुणीही कायदा हातात घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. हातात घेऊन सण उत्सव साजरे कायदा करणा यावर पोलीसांची करडी नजर आहे. कायदा हातात घेणा यांवर पोलीस आपल्या पध्दतीनेच कारवाई करतील, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी येथे दिला.गणेशोत्सव- २०२२ या धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा वृध्दींगत करण्यासाठी आयोजित शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती होते… प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, अपर पोलीस अधिक्षक एस. श्रवण दत्त,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी मुख्याधिकारी मनोहर अकोटकर,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अजितपालसिंह दिनोरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पोलीस अधिक्षकांनी पोळा येथील दगडफेक प्रकरणी कुणावरही अन्याय झालेला नाही.निरपराध लोक अडकरणार नाही याची काळजी घेण्यात आली.मात्र, अशाही परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचे प्रयत्न होत असतील तर पोलीस आपल्या पध्दतीने कारवाई करतील, असा अप्रत्यक्ष इशाराच संबंधितांना या बैठकीतून दिला.
