प्रतिनिधी, विजय लोणक पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जुन्या नव्या या सर्व इमारती मध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मोठ्या संख्येने सुरू आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य पालिकांमध्ये इमारतीच्या टेरेस वरील सर्व प्रकारची अनाधिकृत तसेच इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेले हॉटेल्स वर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तथापि पुणे महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीतील अनाधिकृत बांधकामे, टेरेस, हॉटेल बर कारवाई करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आले आहे
या सर्व प्रकरणामुळे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील टेरेस हॉटेल बार वर पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभाग कारवाई का करीत नाही असा प्रश्न निर्माण झाला. पुणे महानगर पालिकेचे शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे कारवाई करण्यात दिरंगाई का करीत आहेत असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये टेरेस वरील हॉटेल रेस्टॉरंट बार आहेत. गार्डन रेस्टॉरंट सुरू आहेत. पार्किंग मध्ये रेस्टॉरंट सुरू आहे. तरी यांच्यावर तातडीने कारवाई करून, मुजोर हॉटेल रेस्टॉरंट बार चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच ज्या सोसायटीच्या इमारतीमध्ये टेरेस वर फ्रंट बार सुरू आहे, त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून नियमभंग याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.( क्रमशः)
