प्रतिनिधी, अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लोणी मध्ये कार्यकर्त्याच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी लोणी मधील कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष घालून गुलालाची उधळण केली. तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विखे पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या.
