प्रतिनिधी, बुलडाणा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी तालुका प्रशासनाच्यावतीने पॉलिटेक्निक कॉलेज मधून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली यामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिक व विद्यार्थी यांचा सहभाग होता सदर तिरंगा रॅली जलंब नाका,न्यायालय, पंचायत समिती,बस स्टॅन्ड,विकमशी चौक,कृषी उ. बा.समिती समोरून टिळक पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर न प मैदान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला व त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले तर 13, 14,15, ऑगस्ट रोजी सामान्य नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा एक चांगली संधी प्राप्त झाली असून घरोघरी हर घर तिरंगा म्हणत प्रत्येक घरावर एक तिरंगा लावण्यात येणार आहे.
