जनतेज न्युज

राजस्थान मधील दलित अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशी द्या- वाल्मिकी सेना भारत व मेहतर वाल्मीकी महासंघ यांचा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

प्रतिनिधी , पुणे : राजस्थान मधील जल्लोर जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील वाल्मिकी समाजाच्या एका नऊ वर्षाच्या बालक इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याने शाळेतील पाण्याच्या माठाला स्पर्श केल्याने, शिक्षकाने त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत इंद्रकुमार मेगवाल या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तसेच जयपूर जिल्ह्यातील रायसर गावात अनिता रेगर या शिक्षिकेला त्यांच्या दोन लहान बालका सोबत विना मेमोरियल शाळेत जात असताना एकूण 9 नराधमांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले आहे. राजस्थान मध्ये जातीय स्वरूपाचा उच्छाद सुरू असून राज्य सरकार दलितांचा संरक्षण करण्यात कमी पडत आहे. दलितांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी वाल्मिकी सेना यांनी आज जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की राजस्थान मधील दलितांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्ट केस चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी, दोन्ही घटना तील मृतांच्या परिवाराला पन्नास लाख रुपये राजस्थान सरकारने मदत म्हणून देण्यात यावी, दोन्ही घटना तील भुतांच्या परिवाराची सुरक्षेची व्यवस्था राज्य शासनाने तातडीने करण्यात यावी, तसेच दोन्ही पीडित परिवाराच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा मागण्या करण्यात आलेला आहेत.
याबाबतचे निवेदन वाल्मिकी सेना भारत, मेहतर वाल्मीकी महासंघ यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पुणे यांना सादर केले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर पनिकर, रवी परदेशी दीपक नेणाऱ्या रेखा राजे विनोद नाऱ्या शैलेंद्र चव्हाण अजय रामानंदी, अंजू बेगी शकुंतला चव्हाण मीरा शिंदे संजय देगी प्रमोद कोटियाना यावेळी उपस्थित होते.