प्रतिनिधी , पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक बनावट स्वरूपाच्या बातम्या प्रसारित करून पुन्हा राजरोसपणे अवैद्य धंदे सुरू करण्याच्या हेतूने धंदेवाल्या कडून काही तथाकथित पत्रकारांना हाताशी धरून बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. पुणे शहर पोलिसांची बदनामी करून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणून आपले धंदे सुरू करता येतील अशी कपटी भावना मनाशी बाळगून अनेक धंदेवाईक मंडळी जाणीवपूर्वक खोडसाळपणे बातम्या प्रसारित करीत असल्याचे दिसून येत आहे.
राजेश पुराणिक यांच्याविरुद्ध महीला आयोग ताशेरे ओढले, आयुक्त कारवाई करणार, राजेश पुराणिक यांची बदली झाली, राजेश पुराणिक सस्पेंड झाले. अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान राजेश पुराणिक यांचा अवैद्य धंदे वाल्या विरुद्ध कारवाई करताना चा एक व्हिडिओ मार्ग करून कुणीतरी शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी प्रसारित केला आहे. हा व्हिडीओ खात्यातील कर्मचाऱ्यांनी काढला असल्याचा संशय असून व्हिडिओ अवैद्य धंदेवाल्यांना दिल्याचा संशय बळावला आहे.
दरम्यान शनिवार रविवार सोमवार व आज मंगळवार सलग चार दिवस सुट्टी असताना, सर्व शासकीय कार्यालये बंद असताना, निर्णय घेण्यास कोणताही सक्षम अधिकारी उपस्थित नसताना, व्हिडिओ मध्ये महिला नसतानादेखील, महिला आयोगाकडे तक्रार करणे व आयोगाने तातडीने दखल घेतली असल्याची बातमी प्रसारित करणे यामागे मोठे षडयंत्र असून या सर्व प्रकरणाचा पोलिसांनी कसून शोध घेऊन अशा कु प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे.
श्री. राजेश पुराणिक यांच्याविरुद्ध शुक्रवारी व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, काही वृत्तवाहिन्यांनी या बातम्या प्रसारित केल्या. तथापि व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुळातच मोर्स करून प्रसारित झाला असल्याचे दिसल्याने दुपारी चार नंतर खाजगी वृत्तवाहिन्यांनी ती बातमी पूर्णतः बंद केली. तथापि पुण्यातील काही न्यूज पोर्टल मग कधीही प्रसारित न होणाऱ्या साप्ताहिकांमधून बातम्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये देखील काही तथाकथित पत्रकार मंडळी अवैद्य धंदे वाल्यांकडून दर महिन्याला हप्ता वसुली करीत असल्याचे तसेच ऑनलाईन पैसे घेत असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची कसम चौकशीची मागणी होत आहे. सर्व निंदनीय प्रकाराचा पुणे क्राईम न्यूज निषेध करीत आहे. क्रमशः
