प्रतिनिधी, सांगली : सांगलीत ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत ४ आरोपीकडून १५ लाख ४५ हजार किमतीचा माल जप्त केलाय.स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागने ही कारवाई केलीय.आरोपीकडून १२,५०,०००/- रु किमतीचे २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, व १,५०,०००/- रु किमतीचे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्हयातील चोरीस गेलेली ९५,०००/- रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले दोन मोटार सायकल किमत रुपये ५०,०००/- असा एकुण १५,४५,०००/ रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जलस्वराज प्रकल्प कारंदवाडी या ठिकाणी छापा मारुन मोबाईल भैरु पवार (वय १९ रा करंजवडे ता वाळवा जि सांगली , घायल संरपच्या काळे (वय ४६) रा चिकुर्डे ता वाळवा जि सांगली यांना ताब्यात घेतले. तसेच खोत पोल्ट्री फार्म डोंगरवाडी या ठिकाणी छापा मारुन इकबाल भैरु पवार वय ४० रा, करंजवडे ता वाळवा आणि प्रविण राज्या शिंदे वय ३१ रा गणेशवाडी वडुज ता. खटाव जि सातारा यांना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेतले
