जनतेज न्युज

विनायक मेटे यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील

प्रतिनिधी, बीड :  शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलीय. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी, आज मेटे यांच्या बीड शहरातील तुकाई निवासस्थानी दाखल होत, मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतलीय. यावेळी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, मुलगा आकाश मेटे, भाऊ रामहरी मेटे, मुलगी आकांक्षा मेटे यांच्याशी त्यांनी संवाद साधला.दरम्यान मेटे यांचे मराठा आरक्षण असेल किंवा सारथी योजना असेल यासाठी मोठं काम आहे. सबंध राज्यात त्यांनी मोठी चळवळ उभी केलीय. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलंय. अशी खंत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलीय. तर मेटे यांच्या अपघाताच्या संशयाची संधीगधा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करून दूर करावी, अशी माझी त्यांच्याकडे विनंती आहे. अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील केली आहे.