जनतेज न्युज

गणेशोत्सवासाठी कुंभार वाड्यात सुरू झाली लगबग : मंडळांच्या कार्यकर्त्यांची ही वाढली रेलचेल

प्रतिनिधी, सातारा :  गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपल्याने कुंभारवाड्यांमध्ये गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली असून प्लास्टर पासून मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने उशिरा मान्यता दिल्याने कुंभारवाड्यामध्ये मंडळाचे गणपती बनवण्याचे काम मोठे युद्ध पातळीवर सुरू झाले आहे तर काही मंडळाच्या गणपतींवर शेवटचा हात मारला जात आहे.  यंदा राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध लादले नसल्याने सर्वच गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती भव्य दिव्य असाव्यात यासाठी कुंभारांकडून त्या मूर्ती तयार करून घेतल्या आहेत. सध्या याच मूर्तींवर आता शेवटचा हात मारला जात आहे आपल्या गणेश मंडळाची मूर्ती लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी मंडळाचे कार्यकर्ते देखील कुंभार वाड्यात गर्दी करून मूर्तिकारांना सहकार्य करताना दिसत आहेत त्यामुळे कुंभारवाड्यामध्ये आता गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेले चे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसला उशिरा परवानगी दिल्याने तसेच कच्च्या मालाच्या किमती देखील वाढल्याने यंदाच्या गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेल्या चे देखील मूर्ती कारांकडून सांगितलं जात आहे मात्र दोन वर्षानंतर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवामध्ये यंदा कोणतीही बाधा येऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या खिशाला कात्री लावून वाढलेल्या मूर्तीच्या किमतींची रक्कम उभा करण्यास सुरुवात केली आहे