प्रतिनिधी, ठाणे : मराठी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे भाजप प्रणित आयोजित सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव या वर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून स्वामी प्रतिष्ठान यंदाच्या दहीहंडी उत्सवात एकूण ५१ लाखांची बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यामातून राज्यातील ग्रामीण भागतील ७५ हजार गरजू महिलांसाठी कॅन्सर तपासणी करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला आहे. ठाण्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा .श्री .एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके नेते, मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक असतिल. तसेच महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुलजी नार्वेकर साहेब आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय असेल.याव्यतिरिक्त अनेक राजकीय नेतेमंडळी, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची हजेरी लावणार असल्याची माहिती स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वामी प्रतिष्ठान एक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे जिच्यामार्फत आम्ही समाजातील विविध घटकांसाठी, विशेषतः गरजू लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवते, २०१८ आणि २०१९ साली आम्ही ठाण्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते, जवळजवळ ४५० नोंदणीकृत गोविंदा मंडळांच्या १ लाखाच्यावर गोविंदानी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या निधीतून आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केली. ह्यावर्षीही आम्ही काही नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन ७५ हजार गरजू महिलांसाठी कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक बालगोपाळांचा जीव की प्राण. गोपाळकाल्याची हंडी फोडायला सर्व गोविंदा पथकं दरवर्षी मोठ्या जिद्दीने सराव करत असतात.याच गोविंदा पथकांच्या मेहनतीचा सन्मान करणारं स्वामी प्रतिष्ठान. गेली दोन वर्षांतील कोरोना काळात हा महोत्सव साजरा करता नाही आला .पण ह्या वर्षी ही उणीव भरून काढायला आम्ही सज्ज होतो.स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष! सेलिब्रिटी हंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत २०१८ साली अनेक मान्यवरांनी तसेच लोकप्रिय कलाकार उपस्थित राहून महोत्सवाचे आकर्षण ठरले होते. स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीची दखल फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देश परदेशात घेतली जाते. भरघोस बक्षिसं देणारा, देशभरात मीडियाचे थेट प्रक्षेपित होणारा हा मानाचा दहीहंडी महोत्सव आता पुन्हा येतोय तेवढ्याच ऊर्जेने, त्याच जोशाने हा दहीहंडी महोत्सव हा ठाणे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असेल,
