जनतेज न्युज

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन आरोपीसह 1 लाख 17 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

प्रतिनिधी , बुलडाणा : जिल्ह्यातील बोदवड-पिंपळगाव देवी रस्त्यावर अवैधरीत्या वाहनाद्वारे दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क  अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यावरून सदर सापळा रचून दोन आरोपीसह एक लाख 17 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..ही कारवाई आज आपाढी एकादशी व कोरडा दिवसाचे अनुषंगाने करण्यात आली आहे ..या कारवाईत मोटर सायकल व 180 मि.ली.क्ष.च्या 240 देशी दारुच्या सिलबंद बाटल्या तसेच 90 मि.ली.क्ष.च्या 300 प्लॉस्टिकच्या सिलबंद बाटल्या व विदेशी दारुच्या 180 मि.ली.क्ष . च्या 96 मॅकडॉल नं .1 च्या व इम्पीरीयल ब्लु या ब्राण्डच्या सिलबंद बाटल्या असा एकुण 1,17,330 रुपये चा मुद्देमाल जप्त करून मोताळा तालुक्यातील 40 वर्षीय सुनिल महाले आणि गणेश कांडेलकर यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.