जनतेज न्युज

नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील – खा. प्रताप पाटील

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.खासदार चिखलीकर यांनी रविवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. निळा, एकदरा, आलेगाव या भागात शेतीचे शंभर टक्के नुकसन झाले आहे. हे नुकसान मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त झाल्याचं खासदार चिखलीकर म्हणाले. लवकरच या नुकसानीचे पंचनामे होतील आणि जिल्हाधिकारी शासनाकडे अहवाल पाठवतील असं आश्वासन खासदार चिखलीकर यांनी दिलं आहे व काही घरांमध्ये पाणी देखील गेल्याने त्यांचे धान्य खराब झाले आहे अशा लोकांना त्वरित प्रशासनाच्या वतीने धान्य देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. गरिब माणसांच्या घरातले धान्य भिजलेले आहे. तर ते उपाशी राहु नये यासाठी सुचना दिलेली आहे.