प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील जनुना येथील दादाराव सरदार यांना गावातीलच आरोपी अमोल शिवाजी पवार यांनी लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये दादाराव सरदार यांच्या छातीत व पोटात गंभीर मार लागल्याने त्यांना सुरुवातीला धाड, तेथून बुलडाणा आणि बुलडाणा वरून औरंगाबाद घाटी रुग्णालय येथे रेफर करण्यात आले होते. दादाराव सरदार व अमोल शिवाजी पवार यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून शेतीचा वाद होता, त्यातूनच ही मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात धाड पोलीस ठाण्यात 29 जून रोजी तक्रारही दाखल करण्यात आली होती, परंतु दादाराव सरदार यांच्यावर औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच 6 जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या शवाविचेदन अहवालावरून आरोपी अमोल शिवाजी पवार याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
