प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील 6 मूर्ती चोरीला गेल्या आहेत.राम, लक्ष्मण, सीता,हनुमान,या देवतांच्या पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती चोरीला जाऊन 48 तास उलटले आहे.मात्र अजूनही या मूर्ती न सापडल्यानं ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.श्रीराम मंदिराबाहेर हे आंदोलन सुरु करण्यात आलंय. या आंदोलनात गावातील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.जोपर्यंत मूर्ती मिळणार नाही तोपर्यंत आमच्या मनाला चैन पडणार नाही.ज्या दिवशी मूर्ती मिळेल तो दिवस आमच्यासाठी दिवाळी दसरा असेल असं समर्थ रामदासांचे 11 वे वंशज भूषण स्वामी यांनी म्हटलं आहे.
