प्रतिनिधी, बालकांमध्ये विशेष आकर्षक असलेलं सोनपाखरू आता दिसेनासे झाले आहे.साधारणता पंधरा-विस वर्षापुर्वी सोनपाखरू हा बालकांचा सर्वाधिक आवडता मित्र ठरला होता.अगदी अंगाखांद्यावर बालके सोनपाखराला खेळवायाची.सोनपाखरांची रंगीबेरंगी अंडे कुणाकडे अधिक आहेत याची जणू होळ लागायची. कधी काळी बालकांचे विश्व व्यापून बसलेले हे सोनपाखरू आता दुर्मिळ झाले आहे.ही प्रजाती संकटात आहे.मोबाईल हाताळणाऱ्या चिमुकल्या हातांना सोनपाखराचा स्पर्श अनोळखी आहे.मात्र आज म्हातारपणाचा उंबरठ्यावर असलेल्यांनी या किटकाला सर्वाधिक प्रेम दिलं होतं,हे विसरणे अशक्य. भारतातील अत्यंत सूंदर,आकर्षक किटकापैकी एक किटक म्हणजे सोनपाखरू. ग्रामीण भागात सोनपाखरू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किटकाचे शास्त्रीय नाव ” इंडीयनषज्वेल बिटल ( indian jewel beetle )” असे आहे.ही एक किटक प्रजाती आहे. साधारणता पंधरा-विस वर्षापुर्वी हा सोनपाखरू हमखास काटेरी झूडपावर सापडायचा. या किटकाला पकडण्यासाठी बालके धावत सूटायची.या किटक जेवढा सूंदर तितकीच याची अंडी सूंदर असायची.आगपेटीत या किटकाला बालके ठेवायचे.हा किटक रंगीबेरंगी अंडे द्यायचा.अगदी अंगाखांद्यावर बालके सोनपाखराला खेळवायची.सोनपाखरे पकडण्यासाठी अख्या दिवस घालवायची.त्याकाळातील बालकांचे अवघे विश्व सोनपाखरांने व्यापून टाकले होते.मात्र बालकांचा हा आवडता सोनपाखरू आता हरवित चालला आहे.दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.मोबाईल हातळणार्या बालकांना सोनपाखरू कसा दिसायचा हे ही सांगणे कठीण होवून बसले आहे.गावाजवळ असलेल्या झाडाझूडपावर दिसणारा सोनपाखरू आता केवळ फोटोत दिसत आहे.
