प्रतिनिधी, सोलापूर : हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील ‘डीवायएफआय’च्या तरुणांनी सोलापूर ते राजगुरू नगर बाईक रॅली काढली आहे.सोलापुरातील हे तरुण आज पहाटे पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगरला रवाना झाले आहेत.आज संध्याकाळी राजगुरू नगरला पोहंचुन हुतात्मा राजगुरुंना अभिवादन करण्याचा या तरुणांनाचा मानस आहे.सोलापूर ते राजगुरू नगर हा जवळपास २९१ किमीचा प्रवास आहे.
