जनतेज न्युज

सोलापुरातील हिप्परगा तलावाशेजारील घरांमध्ये घुसले पाणी; ४० घरातील लोक झाले बेघर

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील हिप्परगा तलावाशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.मागील अनेक वर्षांपासून हे लोक त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे,स्थानिक आमदारांकडे मागणी करत आहेत.मात्र कुणीही यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही अशी तक्रार या नागरिकांची आहे.प्रत्येकवर्षी पावसाळ्यामध्ये या लोकांना आपली घर सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागतं.हिप्पारग्यातील जवळपास  ४० घरांमध्ये सध्या पाणी घुसलेलं असल्यामुळे, या सर्व कुटुंबांना आपली घर सोडावी लागली आहेत.अजून एक दोन दिवस पाऊस पडल्यास उरलेल्या दहा ते पंधरा कुटुंबांना देखील आपली घरे सोडावी लागणार आहेत.