प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच नराधम दोघांनी एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवून अपहरण करीत कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. या घटनेने एकच खळबळ उडली असून समजमन सुन्न पडले.पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला.पीडिता ही शाळे समोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात जबरदस्ती खेचत नेत बसवले. पीडिता ही आरडाओरड करीत होती.पण, कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केले पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केलाय.
