जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही उमेदवार शिल्लक ठेवू नका – चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी, धुळे : भाजप पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज प्रदेशाध्यक्ष पद भेटल्यानंतर पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पक्षाची संघटनात्मक बैठक या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी आपल्या भाषणातून संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही कार्यकर्ते उमेदवारी लढवण्यासाठी शिल्लक ठेवू नका, असेच थेट आव्हान उपस्थित कार्यकर्त्यांना केले. येणाऱ्या काळात भाजप पक्षामध्ये हजारोंच्या संख्येत अगदी मोठ्या प्रमाणत राष्ट्रवादी काँग्रेस, व उध्दव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश करून घेण्याचे काम तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी करण्याचे आवाहन देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणा दरम्यान उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले. तसेच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी एकही कार्यकर्ता शिल्लक ठेवू नका असा संकल्प करा अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. एक वर्ष संपताच विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार असल्याचे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याकडे सणवार सुट्ट्या व पाऊस वगळता आपल्याकडे फक्त दोनशे दिवस शिल्लक असल्याचे म्हणत लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आवाहन जमलेल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व आता शिवसेना नाही तर उद्धव गट असे म्हणत हे तीनही पक्ष एकत्र आले तरी, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 45 प्लस जागा या मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडून देण्याचे आवाहन देखील यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना बावनकुळे यांनी आपल्या भाषणादरम्यान केले आहे.