जनतेज न्युज

RNO अनिल साबळे, सिल्लोड जि. औरंगाबाद.

प्रतिनिधी : आगामी प्रत्येक निवडणुकांत भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा निर्धार करत भाजपवर चौफेर फटकेबाजी करीत शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन सिल्लो ड येथे राज्य मंत्री अब्दुल सत्तार व शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठकित करण्यात आले आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी, शेतमजूर हवालदिल झालेला असून भाजपला त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहून येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पालिका, नगर पंचायत आशा प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकविण्याचा निर्धार सिल्लोड येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत करण्यात आला.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, विधान परिषद सदस्य तथा जिल्हाप्रमुख आंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेचा विश्वास घात करणारा भाजप आपला प्रमुख शत्रू असून येत्या निवडणुकीत भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी यावेळी उपस्थितांना केले. बैठीकस मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी करीत गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मतदार संघातील विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.