प्रतिनिधी, अहमदनगर : संमनेर तालुक्याच्या पठार भागातील मुळा खोऱ्यातील बाजरीचे मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण आदिवासी शेतक-यांच्या वर्षभराच्या धान्याचे नियोजन कोलमडल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावून घेतला आहे. आता खायचं काय? जगायचं कसं? अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. आदिवासी शेतकरी वर्षभराच्या धान्यासाठी उन्हाळी बाजरी व ज्वारीचे पिक घेतो. यातून भरघोस धान्य उत्पादन झाल्यास कुटुंबाची धान्याची चिंत्ता मिटते मात्र यंदा काढणीला आलेली बाजरी झालेल्या मुसळधार पाऊस व वादळात क्षणात भुईसपाट झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी आपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
