प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागामध्ये विजेचा लपंडाव पाहायला मिळतोय. कांदा लागवड अंतिम टप्प्यात आलेली असताना वीजेचा लंपडाव सरू असुन शेतकरी चिंतेत सापडले आहेत. संगमनेर तालुक्याच्या घारगाव महावितरण कार्यालयाशी शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क साधला मात्र तिथे उडवा उडवी ची उत्तर शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत कांदा लागवडीसाठी मजूर घेऊनही त्यांचा रोज आता शेतकऱ्यांना अंगावरती भरावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे व वीज सुरळीत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
