जनतेज न्युज

संगमनेर तालुक्यातील शिक्षक पत्रकारांवर कारवाई करा

प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्यात व शहरात अनेक शालेय करत आहे ज्यामध्ये शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील शिक्षक राजरोसपणे शाळेच्या वेळेत पत्रकार म्हणून फिरताना दिसतात सामाजिक व राजकीय व्यासपीठावर नेहमी पत्रकाराच्या भूमिकेत शिक्षक मित्र दिसतात त्यामुळे शिक्षक हा पत्रकार असावा किंवा नसावा हा विषय महत्त्वाचा नसून शिक्षक हा देशातील एक आदर्श नागरिक घडवण्याचे काम करत असतात ज्ञानदानाचे काम करत असतात हे नागरिक घडवायचे काम सोडून जर इतर काम जर शिक्षक शाळेतील वेळेत करत असेल तर विद्यार्थी घडवायचं काम निश्चित कोणी करावे आज सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे पत्रकार दिनी संगमनेर तालुक्यातील विविध पत्रकार एकत्र येत जेष्ठ पत्रकार गौतमजी गायकवाड यांच्या नेतृत्वात येऊन शिक्षक पत्रकारांवर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन देऊन कारवाई करण्यात यावी असे ठाम भूमिका घेतली आहे. आता भूमिकेवर गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर सुद्धा सकारात्मक चर्चा दाखवत शिक्षक पत्रकारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे शिक्षक पत्रकार एक प्रकारे विद्यार्थी वर्ग पालक वर्ग व शाळा चालकांवर दबावतंत्राचा वापर करत असल्याचे बघायला मिळत आहे पगार शासनाचा काम पत्रकारितेचं या दोन्ही गोष्टी बघायला मिळतात त्यामुळे एक तर त्यांनी पत्रकारता करता करावी किंवा शिक्षण दानाचं काम प्रामाणिकपणे करावे हीच आमची इच्छा असल्याचे सर्व पत्रकार बंधू भगिनीं सांगितले.