जनतेज न्युज

सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध जातीय विद्वेष पूर्ण गळचेपी करणाऱ्यांना पुणे न्यायालयाचा दणका.

आंबील ओढा एस आर ए  विकासकावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश

प्रतिनिधी, पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे विकसक केदार सहकारी दिलीप देशमुख यांनी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते किशोर मनोहर कांबळे यांच्या विरोधात पैसे मागणे , कामात अडथळा आणणे , धमक्या देणे अश्या खोट्या तक्रारी दत्तवाडी पोलीस ठाण्यात केल्या होत्या त्याविरोधात किशोर कांबळे यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी दत्तवाडी पोलीस ठाणे , आणि पुणे पोलीस आयुक्त दोन्हीकडे दिलीप देशमुख व बिल्डर केदार असोसिएट्स चे निकम पिता पुत्र यांची तक्रारी केली होती तथापि पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता किशोर कांबळे यांचे अर्ज दप्तरी दाखल केला होता . कांबळे हे गेल्या वर्षभरापासून आंबिल ओढा सरळीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहेत . झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील उर्वरित गरीब , दलित नागरिकांस न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते त्यांना वारंवार बिल्डर कडून त्रास होत होता त्यामुळे कांबळे यांनी शिवाजीनगर न्यायालयात खाजगी तक्रार केल्याने दिनांक 18 जुलै 2022 रोजी जिल्हा न्यायाधीश व अप्पर सत्र न्यायाधीश पुणे रामटेके साहेब यांनी 156(3) अन्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अधिनियम 2015 भारतीय दंड संहिता अन्वये दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलीप देशमुख व बिल्डर सूर्यकांत निकम, प्रताप निकम यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करावा असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी . ए . रामटेके यांनी दिले आहेत . याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड . अंबादास बनसोडे व अॅड . आकाश साबळे काम पाहत आहेत .