प्रतिनिधी, बुलडाणा : आय एल अँड एफएस कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून आज चौकशी करण्यात येत आहे.या विरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत असून हा भारतीय जनता पक्षाकडून दबाव तंत्राचा वापर केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे..या आरोपावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनोद वाघ यांनी जयंत पाटील यांनी लक्ष्य केले आहे..कार्यकर्त्यांना जमवून जयंत पाटलांनी स्टंटबाजी केली..स्टंटबाजी करण्याची गरज नव्हती..आणि एखाद्यावर आरोप झाला तर त्याने आपले कार्यकर्ते गोळा करायचे..आंदोलन करायचे आणि त्या आरोपातून मुक्तता मिळवायची अशी नवीन प्रथा उद्यायास येत आहेत. आणि हा लोकशाहीवर घाला आहे..त्यामुळे तुम्ही दोषी नसाल तर ईडीच्या चौकशीला सामोरा जा.. सत्य काय ते सामोर येईल आणि जर तुम्ही दोषी असाल तर तुमच्यावर कारवाई होईल..पण विनाकारण कार्यकर्ते गोळा करायचे,आंदोलन करायचे आणि जनतेची दिशाभूल करायची हे कुठेतरी थांबले पाहिजे,आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, म्हणत ईडीवर आरोप करण्यापेक्षा,भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापेक्षा आपल्यावर जे आरोप झाले त्याला सामोरे जा..असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते विनोद वाघ यांनी सल्ला दिला आहे.
