जनतेज न्युज

शासकीय तंत्रनिकेतन येथे बांधलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरू करण्यासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन

प्रतिनिधी, बुलडाणा : खामगाव जलंब रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे दलित,आदिवासी, अल्पसंख्याक मुलींसाठी बांधून तायर असलेले वसतिगृह सुरू करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने सदर वसतिगृहासमोर धरणे आंदोलनकरण्यात आले. दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींसाठी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे वस्तिगृह बांधूंन पूर्ण झालेले आहे. गेल्या दोन वर्षेपासून सदर वस्तिगृह धूळखात असून मुलींना शिक्षणापासून, सुख-सोइपासुन वंचित ठेवण्याचा घाट अधिकारी वर्गाने घातला आहे. याविरुद्ध शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने आवाज उठविण्यात येत असून आज सदर वसतिगृहा समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. सदर इमारत ताब्यात घेवून प्रवेश प्रक्रिया ताबड़तोब सुरु करून दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक मुलींना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.