प्रतिनिधी, सातारा : मॉलमध्ये वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाई यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
मॉलमध्ये वाईन विक्री संदर्भात राज्यात गदारोळ उठणारे वक्तव्य मी केले नाही. मागच्या सरकारने हा घेतलेला निर्णय यावर जनतेचा अभिप्राय आणि जनतेचे मत मागण्यासाठी लोकांच्या हरकती आपण मागवला होत्या. याबाबतचा अहवाल जेव्हा माझ्याकडे येईल त्यावेळेस मी स्वतः त्यावर माझं मत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करेन आणि आम्ही मिळून मंत्रिमंडळात निर्णय घेऊ असे सांगितलं आहे.
आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थाची परवानगी मागितली होती आणि ठाकरे गटाने देखील याच ठिकाणी मागितली होती. ती परवानगी आम्हाला न मिळता ठाकरे गटाला मिळाली असून कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.मात्र आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने दसरा मेळाव्याचे आयोजन करू.आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने लुटण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे.वंदनिय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने आम्ही दसरा मेळाव्याला लुटणार आहे. आम्ही पर्याय व्यवस्था म्हणुन बी.के.सीचे मैदानाची मागणी केली होती.
दसरा मेळाव्याच्या निकालाबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून बिकेसीच्या मैदानाची मागणी केली आहे.. तेथे जोरदार मेळावा घेण्याची आमची तयारी सुरू झाली आहे अस देसाई यांनी सांगितलं आहे.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी मधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत.सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आता जिल्ह्यात आठ पैकी चार राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार शिल्लक राहिले आहेत. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात 2024 मध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याचे दिसेल. आमदार शशिकांत शिंदेंना खोके घेऊनच पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला सांगावे आणि 50 खोके घ्यावे असे सांगत राष्ट्रवादी पक्षावर हल्लाबोल केला.
